STORYMIRROR

Dipali patil

Inspirational

4  

Dipali patil

Inspirational

ईश्वर दूत

ईश्वर दूत

1 min
445

गुरु हा ज्ञानियांचा राजा

इश्वरीय सर्वज्ञ दूत

सगुण रूप ईश्वराचे

मार्ग दाखवितो अज्ञानात


परंपरा ही भारताची

महान गुरु शिष्यांची

अखंड व्रत ज्ञानदानाचे

गुरु धार वात्सल्याची


त्रिदेव वसतात गुरुत

समर्थ उद्धार करण्याला

करूनी अंधकार दूर सारा

ज्ञानज्योत पेटवतात जीवनात


जान देतात सत्य असत्याचे

वाट दाखवितात प्रगतीची

गुरु म्हणजे मायबाप

शिकवण देतात आयुष्याची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational