हसुन पुढे गेले...
हसुन पुढे गेले...
कधी थकून बसले ,
तुझ्या प्रश्नांपुढे ,
उत्तरे दिली तर कधी ,
काही ना उत्तर उरले ,
सोडून त्यांना दिले ,
जे अनुत्तरीत राहीले ,
लव्ह यु जिंदगी म्हणत ,
हसुन पुढे गेले ...
सर्वच प्रश्न सोडवायचे नसते,
काहीना वेळेवर सोडायचे असते,
तुच देते मग उत्तरे ,
ते अनपेक्षित असते ,
कायापालट जिवनाची ,
मौन नियती सोडते ,
काही तिने सोडविले,
जे अनुत्तरीत राहीले ,
लव्ह यु जिंदगी म्हणत ,
हसुन पुढे गेले ...
वेळेचा खेळ सर्व ,
आजचा राजा उद्या भिकारी ,
कुठे रंक झाला राजा ,
समजेच्या खेळापलीकडले ,
कुठे तरी फासे पडले ,
शंका नको न सवाल आता ,
तुला काही कळले,
जे अनुत्तरीत राहीले ,
लव्ह यु जिंदगी म्हणत ,
हसुन पुढे गेले ...
