हरवतो मी हरवतो
हरवतो मी हरवतो
दूर होऊनी माझ्यापासून मीच मला विसरतो
हरवतो मी हरवतो, हरवतो मी हरवतो......
पक्षांच्या पायाला बिलगून बियाण होतो जातो वाहू
माळावर पडतो, रुजतो, मातीमधूनी अंकुर्तो....१
निळे सावळे जमती मेघ दिसे विजेची कोमल रेघ
प्रेम वर्षाती मेघ मातीचे अत्तर होवूनी घमघमतो
कधी मी होतो समुद्र गाज, कधी लेवुनी चांदण साज
संध्येच्या गालावर लाज, चंद्र दिठोना मी करतो...३
पर्ण पाचूची हिरवी सलसल, रान फुलांचा मोहक दरवळ
मधुकर केव्हा, केव्हा कोकीळ स्वर संमोहन मी रचतो...४
प्रचंड होवून यंत्र गती कधी नदीची संथ गती
कधी मुलायम कर स्पर्शाने मोरपिसासम थर ठरतो ....५
सारे विसरू न जाता जाता जाता धोक्याच्या वळणावर येता
जाई संपून हरावळेपण, क्षण मला मी सावरतो....६
