हरवले ते गवसते
हरवले ते गवसते
जितकं सहज मी शिर्षक लिहिले...
तितक्या सहजपणे ते गवसत नाही...
ती काय मालिका किंवा चित्रपट आहे गवसायला...
जे हरवतं, ते गवसायला...
आयुष्य पुन्हा संधी देत नाही...
हरवलेल्या गोष्टींचा साठा मात्र राहतो...
कायम स्मरणात राहील अशी व्यवस्था करतो...
का कुणास ठाऊक आपण मोठे होतो...
हरवले ते हरवले...
गवसत नाही म्हणजे नाही.
