ती
ती
ती येत आहे...
सजून सवरून...
संध्याकाळच्या आत...
तीचा नशा चढला आहे...
ते ही मदीरेच्या आधी...।।१।।
आज कित्येक वर्षांनी...
आम्ही समोर असू एकमेकांच्या समोर...
खुशीत आहे मी...
वाटतं जीव नाही ना जाणार भेटीच्या आधी...।।२।।
तिनेच दिले मला...
प्रेमाचे धडे...
ती माझ्या रोमारोमात वसली आहे...
तिच्या विना मी अपूर्ण...।।३।।
माझ्या हृदयात तिच्यासाठी...
मर्मबंधातीलं स्थान आहे...
तिची आठवण...
माझ्या प्रत्येक श्वासाच्या आधी येते...।।४।।
तिचं हसणं...
मी कधी हरवू देणार नाही...
तिच्या खुशी साठी...
मी माझ्या स्वप्नाला विसरून जाईन...।।५।।
ती जेंव्हा येईल...
माझ्या आधी...
मित्रांनो मला तयार करा...
तिला पाहण्यासाठी...।।६।।

