प्रेमाची कबुली...?
प्रेमाची कबुली...?
तिने प्रेमाची कबुली दिली नाही...
पण डोळ्यात तिच्या...
मी माझी छबी बघितली आहे...
तिला चिंता आहे माझी...
अन् जीव माझा तिच्यात गुंतला आहे...
खरं म्हणजे तसं ती काही सांगत नाही...
पण ती स्वतः पेक्षा माझ्यावर प्रेम करते...
नशिबानेच मिळते अशी साथ...
जिने स्वतःच्या श्वासात मला जागा दिली.

