लग्न
लग्न
अन् ती ब्राह्मण होता होता राहिली...
साधारण १९८५चा काळ होता...
आता जसे प्रेम विवाह होतात...
तसा तो काळ नव्हता...
आता तर आंतरजातीय विवाह ही होतात...||१||
मी जात-पात नाही मानत...
त्या काळी मात्र...
ब्राह्मणांचा बोल-बाला होता...
संस्कारांचा प्रश्न होता...||२||
अश्यातच प्रत्येकाला निवडीचा अधिकार होता...
पण अरेंज मॅरेजचा जमाना होता...
आप आपल्या जातीत लग्न व्हायची...||३||
अश्यातच आम्ही सुद्धा प्रेम विवाह चा चंग बांधला...
मनापासून लग्न करायची इच्छा होती...
कुठं बिनसलं काही कळायच्या आत...
स्वप्नांचा चुराडा झाला...||४||
अन् स्वप्नातून जागे झाल्यागत झाले...
काळ १९८५चा होता...
अन् ती ब्राह्मण होता होता राहिली...
खंत आहे लग्न झाले नाही...
दुःख आहे एक होऊ शकलो नाही...।।५।।
