बालपण संपतं - आईच्या नजरेतून
बालपण संपतं - आईच्या नजरेतून
प्रत्येकाला बालपण भुर्रकन उडून जातं...
याचा खेद असतो...
तेच आईच्या नजरेतून बघायचं झालं तर...
इवल्या इवल्या पावलांनी चालणारी मुलं...
बघता बघता धावायला लागतात...
शाळेत, कॉलेजात उच्च क्षिक्षण घेतात...
अन् मोठी होऊन पुढे जातात...
कधी मोठी होतात...
अन् खांद्यावर हात ठेवतात...
पाठ दुखलं तर चेपून देतात...
पाय दुखलं तर दाबून देतात...
आईला कायमंच मुलं लहान...
तिलाही अजून मुलांच्या...
बालपणात रमायचं असतं...
तिच्याही नकळत मुलं मोठी होतात...
आईच्या नजरेतून सुध्दा...
स्वतःच्या मुलांचं बालपण हरवून जातं
