बदलेले युग
बदलेले युग
बदलेले युग
प्रेमाच्या भावना काहीसे बदलले आहेत...
तिला एकदा पाहण्यासाठी...
अन्...
त्याला बघण्यासाठी
जीवाचा आटापिटा केला जात असे...।।१।।
अन् आता...
लोकं घराच्या चार भिंतींच्या पलिकडे जात नाहीत...
जगाला पूर्वी हे पाप वाटंत असे...।।२।।
आजकाल प्रेमाची परिभाषा बदलली आहेत...
लग्न झालेल्या पुरुष स्त्री...
विवाह बाह्य संबंधात अडकतात...
पूर्वी असे करणं चुकीचं मानलं जात असे...।।३।।
आजकालचं प्रेम हे स्वार्थी होऊन गेलय...
आजकालचं प्रेम चलाखीचे...
अन्...
सौदा करुन आपलसं केलं जातं...
तर पूर्वी...
प्रेमात सम्मान देणे...
एकमेकांना आदर करणे...
या वर भर देण्यात येत असे...।।४।।
या आधुनिक युगात...
भौतिक सुख अन् प्रेम...
मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत...
पूर्वी सारखे...
खरं प्रेम कुठंतरी...
हरवल्या गत वाटंत आहे...
येतील का?...
खऱ्या प्रेमाचे दिवस...।।५।।
