STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Tragedy Fantasy

3  

Abasaheb Mhaske

Tragedy Fantasy

हऱ्या - नाऱ्या जिंदाबाद!

हऱ्या - नाऱ्या जिंदाबाद!

1 min
173

हऱ्या हरहुन्नरी

नाऱ्या उडाणटप्पू

जोडी त्यांची खास

रंगा - बिल्लाची साथ


आता ती चांडाळचौकडी

कशा - कशाची कमी नाही

सुकर जगण्याची हमी नाही

सगळीकडे आनंदी आनंद


रंगा - बिल्लाची अफाट श्रीमंती

हऱ्याची व्यर्थ भ्रमंती अन्

नाऱ्याची मुजोरी, पोपटपंची

साथ रिकामटेकडी खोगीरभरती


हिशोब त्यांचा अगदी सोपा

विका काही, विकत घ्या

गॉड बोलून काम काढा कधी

सांम, दाम, दंड, भेद


अंधेरी नगरी चौपट राजा

काक - बगळ्याची चंगळ भारी

रंगा - बिल्ला नावे चांगभलं

हऱ्या - नाऱ्या जिंदाबाद !


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Tragedy