हृदयी प्रीत तुझी
हृदयी प्रीत तुझी
साथ तुझी ही जन्मांतरीची,
ध्यास तुझा हा अंतरीचा,
अबोल होऊनी प्रीत जागवते,
सहवास तुझा हा असण्याचा. .१.
मन गाभारा उजळून येतो,
हृदय मंदिरी नित्य वसतो,
स्वप्न होऊनी नयनांमधले,
निद्रेतूनही तूच जागतो. २.
श्वास होऊनी तूच स्मरतो,
जगण्याचा मग अर्थ उमगतो,
प्रीतीमधल्या स्पंदनातूनी,
समर्पणाचा भाव उमटतो. ३.
आसवातुनी तूच वाहतो,
हास्याची ही खळी उमलतो,
मौनामधल्या अबोल कळीला,
शब्द होऊनी तूच खुलवतो. .४.
