हृदयी होते धडधड नुसती....
हृदयी होते धडधड नुसती....
हृदयी होते धडधड नुसती
तुझ्याचसाठी धडपड नुसती
झाले कोठे बोलुन माझे
तुला जायची गडबड नुसती
रोज मनाला शाकारावे
रोज मनाची पडझड नुसती
दिसेना इथे काळिज ओले
दिसते कोरड कोरड नुसती
कृतीविना रे अर्थ कशाला
किती करावी बडबड नुसती ?
वसंत नव्हता भाग्यामध्ये
वाट्याला ही पतझड नुसती
तुझी आठवण येते जाते
रात्ररात्र मग तडफड नुसती
