ह्रदयात तू माझ्या
ह्रदयात तू माझ्या
राणी आसवांत, शोधू नको मजला!
हृदयात तू माझ्या, काय सांगु तुजला !! धृ!!
मला भेटण्याची, तू इच्छा धरता मनी!
तुझ्याम्होरं राहीन, लगोलगी येऊनी!
तुझ्या संगे, नजरबंद, खेळ खेळला!
हृदयात तू माझ्या, काय सांगु तुजला !!1
चंद्र सुर्य आहे ती, जोवरी आसमंती!
तुझ्या साठीच ,जगणे आता जीवनाती!
तुझ्याविणा, मृतप्राय, जग हे मजला!
हृदयात तू माझ्या, काय सांगु तुजला !!2!!
देईन सुख , सुविधा तुज, जीवनात!
दु:ख यातना, दुर राहतील वाटेत!
ठेवीन सदैव, सुखात, राणी तुजला!
हृदयात तू माझ्या, काय सांगु तुजला!!3
किती वाट पाहु, आता राणी मिलनाची!
किती काळ धीर,अन तग धरायची!!
किती वेळा प्रार्थना, करावी ईश्वराला!
ह्रदयात तू माझ्या, काय सांगु तुजला !!4
जीव माझा तुझ्यावरी, तुझा माझ्यावरी!
अफवा उडवती जने, आपल्यावरी !!
चंद्र साक्षी, आहे राणी, आपल्या प्रेमाला !
ह्रदयात तू माझ्या,काय सांगु तुजला !!5

