STORYMIRROR

Sunil Khaladkar

Inspirational

3  

Sunil Khaladkar

Inspirational

हृदयात भगवा......

हृदयात भगवा......

1 min
131

सर्व जगी संसारात,

ऐसा राजा नाही झाला..

केला गनिमांचा खात्मा,

शूर मावळे जोडीला...||१||


शंकराच्या मंदिरात,

त्यांनी घेतली शपथ..

महाराष्ट्र धर्मासाठी,

निवडला अग्निपथ..||२||


तावडीत सापडले,

तर केला त्यांनी तह..

किल्ले शेकडो जिंकून,

दिला औरंग्याला शह..||३||


अत्याचार स्त्रीवरील,

त्यांना नव्हता सहन,,

कोणी असेल समोर,

केले शत्रूचे दहन .....||४||


कावा खेळला गनिमी,

केला बुद्धीचा वापर..

शूर मावळे पाहून,

भरे शत्रूस कापर ....||५||


राजे होते राजबिंडे,

असे चेहरा तेजस्वी..

शांततेने बोलें ऐसे,

जसा वदतो तपस्वी....||६||


त्यांनी दिलेले विचार,

सर्व मनातं रुजवू..,

हाती घेऊनी भगवा,

महाराष्ट्र हा सजवू...||७||


आठवावी आण त्यांची,

धर्म मराठा वाढवू ...

हृदयावरी भगव्याची,

उंच पताका चढवू...||८||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational