STORYMIRROR

Varsha Kendre

Classics Others

3  

Varsha Kendre

Classics Others

होळी सण आला

होळी सण आला

1 min
146

 होळी सण आला

 आनंदोत्सव घेऊनी

 माणुसकीच्या रंगांची

 उधळण करी जीवनी


 आनंद, प्रेम , उत्साह

 रंग करी गुण साठवण

 रंगांची धुळवड खेळुनी

 गुणांचे करूया जतन


 होळी साजरी करण्या

 एकत्र आपण जमुया

 भेदभाव मनीचे मिटवून

 एकोप्याची होळी करूया


 हेवा द्वेष मत्सर साऱ्यास

 होळीत तिलांजली देऊया

 परोपकारी विचारांनी

 जीवनाची सुरुवात करूया


 जगा प्रकृतीस्वास्थ्य टिकवण्याचे

 ईश्वरास घालू साकडे

 पुरणपोळी गुळखोबरे खाऊन

 जाऊ अध्यात्मातून विज्ञानाकडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics