हळदीकुंकू
हळदीकुंकू
लाविते पतिराजाच्या
नावाने रोज मस्तकी टिकली
आज आहे हळदीकुंकाचा मान
हिरव्या शालुत लाल टिकली शोभली.!
फुलले ओठावरी आनंदाचे हसू
सख्या साऱ्या जणी भेटल्या
जीवाभावाची भेट झाली
ऐकमेकीला तीळगुळ वाटत फिरल्या!
हे आनंदाचे क्षण
आता दिवस वाढेल कणकण
संध्या जाईल दुरवर
दुपारपासून पतीराजासाठी वाटेवर लागेल मन.!
हळदीकुंक करते मी
भांगेत सिंदुर भरते
राया तुझ्यात जीव गुंतला
तुझीच आठवण मनोमनी करते.
