हक्काच्या जमिनीवर...
हक्काच्या जमिनीवर...
गेला तो
माझा बाप
आई बायको
आणि आम्हा चार पोरांना मागे टाकून
गेला कायमचा
खूप दूर
अजून विचारतो माझा लहान भाऊ
की दादा का रे
का नाही जात आपण त्या कोपर्यात
काय सांगाव त्या इवल्याशा पोराला
कसं समजावायचं की
तुझा बाप तिथंच असतो
सहन नाय झाला रे त्याला दुष्काळ
जाण्याआधी वीस दिस फक्त पाण्यावर होता तो
शेवटी तडफडण्यापेक्षा दिलं ढकलून स्वतःला
चाळीस फुट कोरड्या विहिरीत.
रोज समजावतोय तो लहान भावाला
आपल्याला नाय जायचंय त्या वाटेवर
नाय करायची ती मजुरी सावकाराची
खूप शिकून पोट भरायचं आपल्या हक्काच्या जमिनीवर
