STORYMIRROR

Pandit Warade

Drama

3  

Pandit Warade

Drama

हजल

हजल

1 min
13.6K


भेटला मजला फुलांचा हार होता।

वाकण्या इतुका तयाचा भार होता।।


चोर आले चोर आले बोंब उठता।

जावयाला मार पाहुणचार होता।।


ताकही फुंकून आता पीत असतो।

लागला चटका दुधाचा फार होता।।


का बढाया मारता हो मोठ मोठ्या।

बायको पुढती कसे लाचार होता।।


घातली मी शीळ तिजला त्या सकाळी।

लाथ बुक्क्यांचा मिळाला मार होता।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama