STORYMIRROR

Santosh Jadhav

Romance

3  

Santosh Jadhav

Romance

हितगुज

हितगुज

1 min
291

गारव्याने पाजवली मला तिला कॉफी

धुंद त्या मोसमात हितगुज झाली सोपी ||धृ||


ओठांचे गडद ठसे कपास थोडे लागले

मला नव्हते घ्यायचे काही, कॉफीवर भागले

उगाच "एक्सुज मी' म्हणून, मी मागितली माफी

धुंद त्या मोसमात हितगुज झाले सोपी ||१||


गारवा खेळू लागला हलकेच तिच्या बटांशी

बटांनी क्षणात मग, सलगी केली गालांशी

तिने साडीवर शिडकवलेली बहुधा अत्तराची कुपी

धुंद त्या मोसमात हितगुज झाली सोपी ||२||


चोरली नजर तिने जराशे लाजून

गालाच्या मंद खळीत गेली वेडी बुजून

हात हाताकडे सरकताच तिचं अंग कापी

धुंद त्या मोसमात हितगुज झाली सोपी ||३||


बऱ्याच काही गप्पा तशा अबोल्यात संपल्या

बऱ्याच काही उरलेल्या तिच्या नजरेत दिसल्या

आम्हाला होतेच भेटायचे , त्या गारव्याची काय चुकी

धुंद त्या मोसमात हितगुज झाली सोपी ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance