STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

हिरवी पालवी-कविता

हिरवी पालवी-कविता

1 min
1.6K



हिरवी पालवी खुशीत डोलते

नाजूक कोमल, कोवळ्या मनाची

वाऱ्यासंगे नित्ये खेळू लागली

हिरवी गोजिरी, हिरव्या वस्राची


मुक्त हस्ते, दुःख मिटविते

जीवनी सदा चैतन्य खुलविते

नाजूक अंगाने, नाजुक बोलने

गुपित तिचे वाऱ्यास सांगते


शितल वारा, सुंदर वारा

सतत भेटने असते दोघांचे

हळूच स्पर्श करून अंगाला

कोमल लाजने पालवीचे


फुलपाखरांचे नित्य आगमन

नाती जुळविती,सात जन्मांचे

नाजूक सजने, नाजूक नटने

प्रेमबंध हे दोन जीवांचे


हळूच पाखरे गोळा होती

नाती दोघांची जुळविण्यासाठी

किलबिल करुनी ठेका धरती

जुळवून देती बंधनगाठी


मंगल प्रसंगाला कोकीळा हजर

गाण्याच्या सुराने बहरले वातावरण

कुहू कुहू आवाजाने सर्वांचे

मनमुग्धपणे केले मनोरंजन


नको कुणाची वाईट निंदा

वागणे नित्य सदाचाराचे

शिकवण त्यांची परोपकाराची

आयुष्य जगावे मुक्त आनंदाचे


सदा आनंदी आपण रहावे

अमूल्य शिकवण मानवाला

भले करण्याला देह झिझवावा

सुखी करावे आपण विश्वाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational