Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Chandan Pawar

Inspirational

3  

Chandan Pawar

Inspirational

हिरकणी..

हिरकणी..

1 min
363


उगवला तो सोनियाचा दिन

झाले घरी लक्ष्मीचे आगमन,

करावे स्‍वागत स्‍त्री जन्‍माचे

मिळूनी सर्वांनी आनंदून!

   जन्माने एका स्त्रीच्या

  अनेक नाती निर्माण झाली,

  आई-वडील व परिवाराला

  जन्मोजन्मीची ओळख मिळाली!

परंपरेने मिळते घरदार

मनी असे सदैव संस्कार,

आदराने करिते नमस्कार

जोडूनी ठेविते परिवार!

  कर्तव्यपूर्तीची तू यामिनी

   निष्ठावंत तु कामिनी,

   शत्रूसाठी तू रणरागिनी

   वात्सल्यरुपी तू हिरकणी !

लाभो निरोगी व उदंड

आयुष्य माझ्या भारतीय स्त्री ला,

तिला मिळू दे शक्ती प्रचंड

प्रार्थना करू या देवाला!


Rate this content
Log in