हिरा
हिरा
आता चिंता कसली
काही मिळालं नाही
आशेची वाट फसली
तरी वाट पाही
नयन थकले शोधून
परतीला मिळवत बसले
जग झाले भटकून
मंनं तिथेच वसले
काही काही मिळतंय
असं चुकून वाटलं
सगळं असून कुढतय
नशीब सगळं फुटलं
परतावा नाही कशाचा
मग असं कसं
हिरा असे कुणाचा
म्हणतं सारं फसं
