हॅलोवीन
हॅलोवीन
आत्मे कुटूंबास भेटावयास येती
अशी या मागची कहाणी सांगती
नारंगी, पिवळा रंग नैसर्गिक
काळा रंग भयाचे प्रतीक
भोपळ्यांना भयावह आकार देती
हॅलोवीनचा उत्सव साजरा करिती
भोपळ्यात केली जाते रोषणाई
नारंगी, काळ्या रंगाचा वापर होई
लोक करिती विविध वेशभूषा
तयार होती होता निशा
काळोखात होई हा खेळ
पितरे आपुला घालवती वेळ
