STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Romance Others

4  

SHUBHAM KESARKAR

Romance Others

हे रंग जीवनाचे !!

हे रंग जीवनाचे !!

1 min
289

हे रंग आपल्या जीवनाचे

आपल्यातील वाढत्या प्रेमाचे

विश्वासास प्राधान्य देणारे

खोट्यास न जुमाणणारे

असे हे रंग आपल्या जीवनाचे…..!!धृ!!


कधीनाकधी…….


कटू शब्दांचा भडिमार होत असे

राग मनात निर्माण होत असे

रंग फिकट करण्यास जणू

ह्यांचा मोलाचा वाटा असे!!१!!


मनी भेद हे संचारती सारे

दुःख दाटुनि वाऱ्यावरी वाहे

सुख दुःखाचे जणू प्रलय सारे

आपल्याभोवतीस का बरं यावे??!!२!!


विचार मनी संचारत आहे

डोके जणू भिन्नवत आहे

उत्तर शोधत साऱ्या मार्गावर एकला

श्वासही आता घुसमटत आहे!!३!!


ओंझळीत मिळावे सुख आपल्या

त्यासाठी रात्रंदिन झटत आहे

ओझ्याखाली धरून बघितले स्वःताला

वेदनेसमवेत सारे निष्फळ आहे!!४!!


होत त्याच ते नव्हत झालं

विचित्र संभ्रमात मी अडकलो

जणू काही तुझ्यासाठी मी

वेगळ्या मार्गावर जात राहिलो!!५!!


पण वेळ ती आली नव्हती

तुझ्या प्रेमात ती उमेद होती

उठसूट येणाऱ्या वाईट कल्पनांमधे

एक सुंदर कल्पना मनी उमजत होती!!६!!


जीवनात येणाऱ्या अडचणींवर

एकसाथ आपण मात करू

भुलूनि साऱ्या वादविवादाला

एका क्षणात दूर करू

सोबत राहू एकमेकांच्या

विश्वास आपल्या नात्यात ठेऊ

न जुमानता तिसऱ्या व्यक्तीस

आयुष्य हे स्वबळावर झुंजत राहू

आयुष्य हे स्वबळावर झुंजत राहू!!७!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance