हे कविते...!
हे कविते...!
हे कविते
कुठे आहेस तू..?
हाक मारीत
मी फिरत होतो
आतल्या आत
तिचा शोध घेत होतो
इतरांच्या लेखण्या
झरा झरा पाझरत होत्या
ना ना वीध रंग दावत होत्या
ना ना कळा काढत होत्या
उगाचच दिमाख करत होत्या
राग आला मला कवितेचा
अक्षर शब्द पण
दांडी मारू लागले
म्हंटल
धीर नाही सोडायचा
नाद नाही सोडायचा
तिला धरून दावणीला बांधायचं
आणि एकदा
शुभमंगल करायचं
पण ती बिलंदर
गावेल तर शप्पत
शेवटी गप्प बसलो
तेंव्हा आली
भौकन्न आतून
मग मला कळलं
कवितेला हाका मारून
काही उपयोग नाही
ती आगाऊ
स्वतःच्या मर्जीनेच येते
आणि मनाचा ठाव घेते....!
