STORYMIRROR

Manda Khandare

Tragedy

4  

Manda Khandare

Tragedy

हे कसले जगणे

हे कसले जगणे

1 min
23.8K


मनाच्या बंदीवासात 

अश्रुही बंदीवान झाले 

पानावलेल्या डोळ्यांना बघुन

आता कैक साल झाले


सोसलेले अग्नी दाह

थंड राख झाले

मनाचे चारही कोपरे

आता सुनसान झाले


होते कधी जगणे ते

सुगंधित केवड्याचे

मरणे मृगकस्तुरीचे

आता गंधहीन झाले


चिमणी पाखरे आता

घराला परदेशी झाले

होते कधी स्वप्नांचे

आता घर ते उजाड झाले


शुष्क डोळ्यांतून

जणू प्राण मुक्त झाले

देहाची चिता करत

आता जगणे शमशान झाले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy