हे जीवन सुंदर आहे
हे जीवन सुंदर आहे
मिळाले हे जीवन
हे जीवन सुंदर आहे ,
बाळगावी न तमा
आनंदात जगून पाहे .
नसावा अहंकार
कधीही असा जीवनात,
करावी सर्वांवर
माया, रहावे आनंदात.
मनापासून लावा
जीव आपल्या माणसांना,
अंतरे देऊ नका
प्रेम द्यावे सांभाळताना .
संकटे आली जरी
कितीही मात करा अशी ,
लढा खंबीरपणे
झेलून घ्यावी फुले जशी.
जीवनात येतात
सुखदुःखे प्रत्येकाच्याच
गोड तिखट स्वाद
घ्यावा, क्षण आनंदाचाच.
