हे आदिशक्ती माता
हे आदिशक्ती माता
अनंत स्वरूपा, अविनाशी तू, आदिशक्ती माता
नमन करुनी तव चरणी आई, ठेवितसे माथा
उद्धारक तू भक्तांची,सकलांची तू त्राता
तुझ्या कृपेवीण न होई , कोणी इथे जेता
संकटे अपार जरी ,आई इथे जगतांना
निर्भय मन माझे,तुज चरणी लीन होतांना
जे जे उत्तम , उदात्त , आई ते तू जागविशी
नेहमीच प्रेरिशी मज,लढण्या त्या षड्रिपुंशी
बळ दे,आशिष दे ,आई लढण्या दुष्प्रवृत्तींशी
उन्नत माथा कर्तृत्वाचा,परी लीन तव चरणाशी
