ह्दयातंर
ह्दयातंर
रमणीय सुरेख मनोरे
मधुर हृदयांतर प्रीतीचे
होता मनाशी मनाचे
जुळले नाते रेशमाचे
ठाव घेता तुझ्या मनाचा
कवेत आले कस्तुरी वारे
मोहोळ ऊधळले प्रीतीचे
बेभान नाचले तारे
तुझ्या संगतीत भिजले
मनमंदिरी स्नेहवलय फुलले
तुच हवासा नित्य संसारी
स्वप्नरंग नव्याने सजले
