STORYMIRROR

kishor zote

Tragedy

2  

kishor zote

Tragedy

हात

हात

1 min
13.8K


हात

तान्हया बाळाचे

हर्ष वात्सल्य सुखाचे

अमृत घोट मुखी पान्हयाचे

हात

स्पर्श ओळखी

असे स्तनाशी खेळी

त्या दूध पिते वेळी

हात

ममत्वाने फिरे

उघडया त्या छातीवरी

सकाळ दूपार संध्या रात्री

हात

पौरुषाचे बळ

चूके विवेका मेळ

बलात्कार करी छाती रक्तबंबाळ

हात

कलम व्हावेत

शिवरायांच्या त्या आज्ञेने

थांबेल स्त्रीत्व असे चुरगळणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy