हार - जीत
हार - जीत
अपत्याच्या जन्मापासूनच
हार - जीतीचा खेळ सुरु
अपत्यांमधे भेदभाव
कसा काय होतो सुरु?
समानतेच्या युगातही
हार - जीत चालू आहे
अपत्य होणे हीच जीत
समजायला हवे आहे
खेळातली हार -जीत
मैदानातच सोडायची
कोणीतरी जिंकणार
खिलाडूवृत्ती ठेवायची
केस हरली तरीही
वकील एकत्र येतात
अभिनंदन करुन
हस्तांदोलन करतात
मनासारखे पत्ते जीवनात
सगळ्यांनाच कसे मिळतील?
मिळेल त्यात समाधानाने
हारलेलेही सुखी दिसतील
जीवनाच्या सारीपटावर
लाभे सुख दुःखाचे दान
हार जीत झाली तरीही
मानवा समानच मान
