STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

4  

Manisha Wandhare

Abstract

हा ही भ्रमच असतो ना...

हा ही भ्रमच असतो ना...

1 min
244

कुठेतरी हरवल्यासारखे वाटते
क्षितीजा पलीकडून कोणीतरी
सोबत असल्याचा भास होते
कुणाचा तरी आवाज,
सारखा ऐकू येत असते...

कुणाच्या तरी या आठवणीत
मन स्वतःला विसरून राहते
हा भ्रम कुठे घेऊन जाणार
काय ठाऊक पण सुखावते ...

कोणीतरी सोबतीला असल्याचा
भास अनामिक ओढीने हूरहूरते
त्रास देते दूर कुठून तरी
ऐकू येणारी ती आर्त हाक
आपल्याला आवाज देते...

आपल्याला कवेत घेण्यासाठी
आतुर आहे असं वाटते
आपण त्याच्यासाठी एवढं महत्त्वाचं
की तो तिथून भेटायला येते
मन या वास्तवाच्या दुनियेतून निघून जाते...

आणि त्याच्या सोबत
जायला आतुर होते
तो अचानक येतो कसा
माहिती नाही पण आल्यावर
सार कसं शांत
हा ही भ्रमच असतो ना ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract