STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Inspirational

4  

Aniket Kirtiwar

Inspirational

हा दिवस

हा दिवस

1 min
9.5K


हा दिवस आहे प्रेमाचा

रंगबिरंगी फुलांचा

ज्या भावना उरात दडल्या

शब्दात त्यांना मांडायचा

हा दिवस आहे प्रेमाचा....


कधी कुठे अघटित घडले

डोळ्यांना डोळे अवचित भिडले

तु हासली अन् लाजली ही

यौवनाने मोहरली ही

त्या आठवणी डोळ्यात साचून

स्वप्नात मी रंगायचा

हा दिवस आहे प्रेमाचा....


सांगू कुणाला मला काय झाले

सवंगडी ही फितुर झाले

प्रेमाचा संदेश वाहणारे

कबुतरे ही चतुर झाले

थंडी गुलाबी वाटे नकोशी

वाराही झोंबायचा

हा दिवस आला प्रेमाचा....


मुक्या कळ्यांना जाग आली

फुलून पाकळ्या बोलु लागली

माझे तुझ्यावर प्रेम आहे

फुलांसोबत मी साक्ष आहे


जे ओठांना जमलेच नाही

त्या भावना सांगायचा

हा दिवस आला प्रेमाचा....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational