STORYMIRROR

PRIYANKA JONDHALE

Inspirational

3  

PRIYANKA JONDHALE

Inspirational

ग्वाही

ग्वाही

1 min
126

गरीब मी असले जरी

मनाने गरीब नाही

जगले माणसापरी मी

माणुसकी विसरले नाही


हारले मी आज जरी

हा अंतिम प्रयत्न नाही

उगवेल उद्या नव्याने

सामर्थ्य विझले नाही


आल्या काळोख्या रात्री

पायवाट विसरले नाही

वादळाने वेढले मी

तोल कधिच ढळला नाही


लाऊन एक कंदिल

आयुष्य उजळित चालले मी

भुलवणाऱ्या दुनियेला

भाळले कधीच नाही


झाले वार अनेकांचे 

घायाळ जरी आज मी

घाव उराशी धरून

लढण्यास विसरले नाही


खोटे बोलून सारे

कारूनेस खेळतात लोक

मी शील जपून हृदयी

मळले कुठेच नाही


अष्टांग मार्ग घेऊन मी हाती

दुनिया मजवर हसली जरी

सत्याविना मार्गच नाही

देई बुद्धवाणी ग्वाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational