STORYMIRROR

PRIYANKA JONDHALE

Inspirational Others

4  

PRIYANKA JONDHALE

Inspirational Others

घाम कष्टाचा बोलू लागला

घाम कष्टाचा बोलू लागला

1 min
368

घामाच्या कष्टाची काय चव कळेल तुला

बापाच्या देहाची काय किंमत कळेल तुला

लहानचा मोठा साहेब झाला

दीड दमडिच्या पैश्याचा माज तुला आला


होतास तू तान्हा जेंव्हा ढसा ढसा रडायचा

दुधा साठी मायिच तू रक्त सुद्धा ओढायचा

तुझ्या पोटाच्या खळगिसाठी बाप उपाशी राहायचा

तुझे भविष्य घडविण्यासाठी बाप रात्र न दिनी झटायचा


गाडी पैसा वैभव सार तूझ्या नशिबात आला

माय बापातच फक्त तुला दिसला नाही जिव्हाळा

लेकरा बायको साठी तू बांधून ठेवलास बंगला

माय बापाचा विचार येताच कसा झालास तू आंधळा


पार्ट्या शर्टी मध्ये सारा जमाना गेला

बाप उपाशी होता आजवर उपाशीच राहिला

काय गुणगान गावे तुझे, आज बाप घराबाहेर राहिला

हजार स्वप्न बघणारा देह आज भिकारी झाला


दसरा शिमगा दिवाळी हा कधी नशिबात नाही आला

तेवढे वैभव पाहून तुझे बाप ,मनातल्या मनात झुरू लागला

 या वर्षीची दिवाळी देवा होऊ दे रे लेकरा बाळात

त्याच्या जीवाची चाहूल लागेल का तूझ्या मनास


जन्मदात्या साठी देह तुझा,कधीच नाही हळहळला

दुनियादारीच्या जमान्यात तू,माणूसपण हरवला

स्वतःच्या माय बापाचा तू सहारा नाही बनला

दगडाच्या देवाला तू देव मानून बसला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational