STORYMIRROR

PRIYANKA JONDHALE

Others

3  

PRIYANKA JONDHALE

Others

आचरणात भीम घे तू...

आचरणात भीम घे तू...

1 min
126

डोक्यावरी नको रे डोक्यात भीम घे तू

रक्तात, विचारात ,मनात भीम घे तू


दिलेत बा भीमाने बळ माणूस बनण्याचे

जोरात फक्त एकदा मुखात भीम घे तू


दारिद्र्याच्या अंधारात लाविली एक ज्योत 

बुद्धित रे तुझीया लेखणीत भीम घे तू


झाले जसे खुले ही चावदार ते जलाशय

भागली तहान जन्माची वाणीत भीम घे तू


बघितलेत पुढारी मी घर आपलेच भरताना

बुद्धितेज तू ही आहे ,मनगटात भीम घे तू


सांगून गेले बा भीमा धम्मचक्र तुमच्या हाती

शांतीत क्रांती घडवून ज्ञानात भीम घे तू


लुटतात माय बहिणी भर रस्त्यावर इथे

कायद्याच्या तलवारीने हातात भीम घे तू


मिरवू नको तू प्रतिमा बा भीमाची डोक्यावर

शुद्ध अंतकरण ध्यानी आचरणात भीम घे तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन