STORYMIRROR

PRIYANKA JONDHALE

Others

2  

PRIYANKA JONDHALE

Others

रीत

रीत

1 min
113

नको मज ती कैदेतील दुनिया तुझी

मोकळ्या गगनात थोड रमावेसे वाटते


ऐकते दूनियादारी दररोज या दुनियेची

एकांतात मनाला थोडे सावरावेसे वाटते


काय मिळाले शेवटी मला जपून नात्याला

चक्रव्युव्हात अडकणे आता नकोसे वाटते.


कैकदा हाका दिल्या मी तुला चांदण्या रात्री

तुझ्या सम चंद्राला त्या खुनवावेसे वाटते.


उगाच कशाला दोष वेड्या देतोस ओठांना

शब्द न शब्द तुझे या जन्मी चुंबावेसे वाटते


असू दे रीत जमाण्याची जातीवरून ठरलेली

जुन्या रुढी अंधश्रद्धेला आत्ता तोडावेसे वाटते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन