STORYMIRROR

PRIYANKA JONDHALE

Romance Others

2  

PRIYANKA JONDHALE

Romance Others

फुलले रे क्षण हे...

फुलले रे क्षण हे...

1 min
96

क्षण फुलले रे बरसल्या अवकाळी धरा

तू मोकळे आकाश अन् निर्मळ झरा


गाते कोकिळा बघ सू मधुर वाणी

जुळले प्रेम रुपी हे आपुली गाणी


नभ आकाशी चांदण्या ह्या बहरून आल्या

रातराणीचा सुंगध जश्या दरवळित आल्या


उन्हाच्या झळात वाहतो थंड वारा

पिंपळाच्या सावूलीचा देतो पहारा


आंब्याची ती आमराई मोहरुन आली बघ

दोघांच्या प्रेमात जशी बहरून आली बघ


चिमण्यांची ती चिवचिवाट अन् भन्नाट वारा

खोप्यात नेते पिल्लांसाठी चीमण चारा


सांग रांझना काय सांगू मी ऋतुराज हा

चैत्र वैशाख बहरून येतो घेवून साज हा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance