STORYMIRROR

PRIYANKA JONDHALE

Inspirational

4  

PRIYANKA JONDHALE

Inspirational

कष्ट

कष्ट

1 min
346

कष्टात हरवली जिंदगी सारी

नाही अटला घाम माथ्याचा माथ्यावरि

बघतो दररोज सूर्याकडे सांजवेळी 

कधी मावळून उगवेल गरिबिवरी


राहिलो उपाशी अनेकदा अर्ध्यापोटी

पसरली ना झोळी होऊन भिकारी

लाथाडले सर्वांनी बघून गरिबी

 कधि झूकलो ना कोणाच्या पायावरी


लहानाचा मोठा झालो ,

रुसलो न आजवर कोनावरी

लोक बघून हसतात अजला

माय बाप पोसतात लहान लेकरापरि


मी साहेब होणार म्हणून

 साकडे कित्येक देवावरी

तरायचे तर तूच तार रे आत्ता

उजाळा दे थोडा माय बापाच्या कष्टावरी


परीक्षेला जाता कित्येक

स्वप्न मायबापाच्या उरी

कशे समजावे त्यांच्या कष्टाला

 घोटाळा करतेय इथे यंत्रणा सारी


आज स्वप्नाचा होतय खेळ

माजली असेल जरी अहंकारी

मी पेटेल नव्याने अजून

ही जिद्द नाही हरणारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational