STORYMIRROR

Pavan Pawar

Classics Inspirational Children

4  

Pavan Pawar

Classics Inspirational Children

गुरू

गुरू

1 min
370

जीवन अंधारले होते,

ज्ञानाचा प्रकाश तुम्ही केला

दिशाहीन झालेल्या जीवनाला,

तुम्हीच योग्य मार्ग दाखविला


स्वार्थ ठेवणे अपायकारक असते,

तुम्हीच आम्हाला शिकवले.

दुसऱ्यासाठी जगलेले जीवन सार्थकी लागते,

तुम्हीच आम्हाला सांगितले


पुस्तकात घातलेल्या डोक्याला,

समाजात वावरण्याचे ज्ञान दिले

समाजातील विकृतीवर मात करायचे,

तुम्हीच आम्हाला सामर्थ्य दिले


आयुष्य सुखमय करायचे तर श्रमाची गाठ धरा,

याच धरेसाठी त्या परमार्थाची साथ करा

जीवनाच्या समतोलासाठी स्वत्व त्यागावे लागते,

या स्वार्थामय जगात सरळ आयुष्य जगावे लागते                      


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics