STORYMIRROR

Ashvini Dhat

Inspirational Others

3  

Ashvini Dhat

Inspirational Others

गुरू

गुरू

1 min
13.1K




जीवनशैलीतून शिकविता

उमललेल्या कळ्यांना

तुम्ही फुलविता


कधी हसवता

कधी रडवता

उपदेशातुन मानव घडविता


तुमच्या पावलावर टाकून पाऊल

आम्ही घेतो आयुष्याची चाहूल


तुमचे ज्ञान इतके भरीव

शैली निर्माण होते कोरीव


विद्यविना जाते मती

गुरुमुळे मिळते आयुष्याला गती


संस्कार, सुविचार यांचे मोती

ज्यामुळे मिळते आयुष्यरुपी

सप्तसुरांना गती


शिक्षण म्हणजे ज्ञानरुपी समुद्र

ज्यात गुरुचे नाव

राहील कोरीव मुद्र


ज्ञानदानाचे कार्य तुमचे महान

सतत राहील मनाला जाण

शतदा तुम्हाला प्रणाम

शतदा तुम्हाला प्रणाम


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational