STORYMIRROR

Chandan Pawar

Abstract

2  

Chandan Pawar

Abstract

गुरुत्व

गुरुत्व

1 min
532

जिकडे पाहावे तिकडे

गुरूंची मोठी चलती ;

अज्ञान व भोळेपणामुळे

भक्तांची घागर पालथी .


अंधश्रद्धेच्या बाजारात

गुरुत्वाचा धंदा जोरात आहे ;

कुणाच्या घरी जायला नको

भक्तांची रांग दारात आहे .


गुरू आंधळ्या भक्तीचे

जहर भक्तांना चढवतात ;

अधर्माच्या नावाने भामटे

नुसते उर बडवतात .


दवा पाहिजे दवा देतात

दुवा पाहिजे दुवा देतात ;

मुलंबाळं नसलेल्या भक्तांना

मूलसुद्धा बुवा- बाबा देतात .


श्रद्धेच्या बिळात चमत्कारी

नागोबांची मेख आहे ;

अंगठेबहाद्दर ते सुशिक्षित

भक्तांचा वाढता आलेख आहे.


अनितीच्या सर्वच कामांना

गुरुत्वाचे स्पर्श होतात ;

दुतोंडी गांडूळे जहरी नाग होऊन

समाजातील आदर्श होतात.


गुरूप्रतापाच्या थोतांडाचा

जागृतपणे घ्यावा शोध ;

गुरुत्वाचा दुष्कृत्यांवरून

भोळ्या भक्तांनी घ्यावा बोध.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract