STORYMIRROR

Umesh Dhaske

Inspirational

4  

Umesh Dhaske

Inspirational

गुरु......!

गुरु......!

1 min
312

उंच झेप आमुची

गुरुजनांमुळे

साकारतील कोटी कुळे

गुरुजनांमुळे....!


आभाळ ठेंगणे होते

गुरुजनांमुळे

स्वप्ने फुलती नव्याने

गुरुजनांमुळे.....!


विद्याविभूषीत ज्ञानी 

गुरुजनांमुळे

संकल्पना ,ध्येय नवे

गुरुजनांमुळे.....!


गीत उषःकालाचे

गुरुजनांमुळे

संशोधक शास्रज्ञ भूमी

गुरुजनांमुळे.....!


मूल्यशिक्षण शिदोरी संस्कार

गुरुजनांमुळे

भारतरत्न देशाभूषण

गुरुजनांमुळे.....!


संयम धीर विश्वास शिकवण

गुरुजनांमुळे

व्यक्तीमत्व नव्याने घडते

गुरुजनांमुळे......!


आदर्श नम्रता विनयता

गुरुजनांमुळे

गणवेश रुबाबी माझा

गुरुजनांमुळे....!


मान सन्मान आदर

गुरुजनांमुळे

पुण्याईची उघडली दारे

गुरुजनांमुळे.....!


आकांक्षांना बळ ताकद

गुरुजनांमुळे

उभारी पुन्हा झेप घेण्या

गुरुजनांमुळे.....!


जगणं ताठमानेचे

गुरुजनांमुळे

ज्ञानींयांचा देशआहे

गुरुजनांमुळे....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational