STORYMIRROR

काव्य चकोर

Fantasy

3  

काव्य चकोर

Fantasy

गुरु..

गुरु..

1 min
164

IIगुरुII


गुरु ज्यास नाही 

ऐसा कोण आहे..

गुरुवीना जीवन 

मातीमोल आहे..!!


प्रथम गुरु माता 

जी प्रेम तुला देते..

अजाण बालक ते 

आई प्रथम वदते..!!


द्वितीय गुरु पिता 

जे धैर्य तुला देती..

जगी ताठ मानेने 

जगण्यास शिकवती..!!


तृतीय गुरु शिक्षक 

जे सर्व ज्ञान देती..

सुजाण नागरिक 

तुजला रे घडवती..!!


चतुर्थ गुरु अनुभव 

जो समाज तुज देतो..

जीवनाचा मार्ग तुझ्या 

त्यातून सुकर होतो...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy