STORYMIRROR

Prashant Shinde

Drama Romance

2  

Prashant Shinde

Drama Romance

गुलाब..!

गुलाब..!

1 min
13.5K


गुलू गुलू बोलतात जेव्हा

लाल लाल गोबरे गाल तेव्हा

बर वाटतं.....


म्हणूनच

गुलाबाला मी म्हटल

गुरगुरू नको

लाल डोळे पण करू नको

बरं दिसत नाही...!


उगाचच आता

गुलाल फेकू नको मनावर

लाज वाटते, दुःख होतं

बरं म्हणून जीवनातून निघून जाताना..!


ती हसली लाजली

आणि म्हणाली

गुलाबाचं फुल मी लाडाचं

लागतील काटे तुला, सांग

बरं वाटेल का मला...?


मी गहिवरलो म्हटल

गुलदस्त्यातील प्रेम आपलं

लालबुंदच राहू दे

बरं बाई मला इथूनच परतू दे


ती काहीच बोलली नाही

पण तीन काही

दिल नाही माझं

गुलदस्त्यातील घायाळ हृदय

लाजली आणि हृदयातच ठेवलं

बरं

माझं चिरंजीव घायाळ प्रेम....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama