STORYMIRROR

Sarika Jinturkar

Action Inspirational

3  

Sarika Jinturkar

Action Inspirational

गुलाब

गुलाब

1 min
251

पहाटेची चाहूल लागता 

गारवा खास गंधाळला  

 गुलाब फुलांचा मंद सुगंध 

अंगणी आज दरवळला  


फुलांचा राजा गुलाब तू

 वाढतो काट्यांच्या सहवासात  

सौंदर्याची वरदस्त तुला 

आवडतो सर्वांना तू सर्व फुलात 


 श्रृगांराचे साधन तू साऱ्या ललनांच्या  

बालकापासून ते वृद्धापर्यंत मनास

 भुलवितो तू प्रत्येकाच्या  


तुला पाहूनी कविला 

सूचे रे कविता

 प्रेमिकांच्या प्रीतीवर 

तुझीच रे सत्ता  


ठाउक तुला दुसऱ्यांना 

देणे केवळ आनंद 

 दोन दिवसांचे जगणे तुझे तरी मोहकतो झाले तुझे श्वास जरी बंद  


स्तुती करतात लोक  

गुलाबा तुझ्या मनमोहक 

विविध रूपाची 

काट्यात सुद्धा फुलायचं  

आधी कष्ट मग सुख 

किती वर्णावी थोरवी

 तुझ्या गुणांची 


 दोन दिवसाचे असो,

अगदी साधे तुझे जगणे 

सदा देत राही त्याला 

कधी काय उने 


वाटे कधीतरी मनास

 व्हावे तुझ्यासम गुलाब

 काटेरुपी दुःखातही राखावा रुबाब... 🌹🌹🌹🌹🌹🌹


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action