गरीबी (सहाक्षरी)
गरीबी (सहाक्षरी)
रस्त्याच्या कडेला
बसलो निवांत
गाडयांची ये जा
बघतो ती शांत
वाढलेले केस
तेवढीच दाढी
भाकरी कुटका
कोणी तरी वाढी
झोळी मधे काय ?
नाही देणे घेणे !
उगाच काडीला
हाती उचलणे !!
भिकारी म्हणून
नकाच हिणवू !
आत माणूसच
कसा तो दाखवू ?
