गरिबीचे निर्मूलन
गरिबीचे निर्मूलन
गरिबीचे निर्मूलन होणे गरजेचे असून
अती आवश्यक हा प्रभाग आहे
विश्वात तीन टक्के जनता गरीब असून
एक टक्का जनता श्रीमंत आहे.....
पर्यायी शाषकिय योजनेचा धज्जा उडून
स्वंयसेवी संस्थां ही दानपात्रात अाहे
पाठपूरावा पुरेस्या विवंचनेत सापडून
माघारी वळतांना तो दिसते आहे.......
महागाईचा भस्मासूर वेगात पसरून
श्रीमंताला ही बेजार करतो आहे
करदात्यांवरचा भरना वाढला असून
सर्व जनता आ वासून उभी आहे.......
महागाईला निसर्ग ही कारणीभूत असून
पाण्यालाही पैसा द्यावा लागत आहे
अन्नधाण्याची ही किंमत वाढून
कुपोषीत बालकांचा जन्म होतो आहे......
गरिबीचे निर्मूलन होणे ही गोष्ट
स्वप्नातही अशक्यप्राय वाटत आहे
त्यासाठी लोकसंख्येत होणारी वाढ
करणीभूत असून गरिबाचे हाल आहे.......
शासकिय मदत गरिब जनतेपर्यंत न येता
त्याला मध्येच उधळी खाते आहे
भ्रष्टाचाराने समाजाला पुरते पोखरून
रिकाम्या डब्यासारखे खोकले केले आहे....
गरिबी हा श्राप मिटवण्यासाठी आधी
प्रत्येकजनाला साक्षर वरदान पाहिजे आहे
युक्ती बुद्धी व शक्तीने प्रत्येक क्षेत्रात
इमानेएतबारे रात्रंदिन झटले पाहिजे आहे....
म्हणतात स्वता: गरिबी भोगल्याशिवाय
ती गरिबीची झळ जाणवत नाही
चार पैसे जवळ आल्यावर तीच लोक
गरिबांची मदत कां करत नाही...?
