STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

गृहिणी

गृहिणी

1 min
153

राष्ट्रीय गृहिणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आणि त्या अनुषंगाने होऊ घातलेला आपेक्षित बदल..

बदल...

बदल होतो

बदल होतोय

बदल होणार

यात तिळमात्र शंका नाही-

नारी आता आपली

ओळख यापुढे कधी

आपणहुन दडवणार नाही-

असेल नोकरी वाली

किंव्हा असेल व्यवसायिक

तर ती

अभिमानाने सांगेल जगा

आहे मी वर्किंग वूमन

साथीदार असेल जर नोकरिवाला

किंव्हा व्यवसायिक तर

म्हणते ती स्वतःला

आहे मी हाऊस वाईफ-

पण

सांगताना आपली ओळख

ती कितीही राबत असली तरी

थोडी मनातून ओशाळते..

आपल्या कर्माचे मोल विसरून

पुन्हा पुन्हा स्वतःस

थोड्या नाराजीनेच

सदा न्याहाळते-

इथेच वाटते मनाला

हे तिचे ओशाळणे

कोठेतरी सल कायमची

राखून ठेवते

तिच्या श्रमाचे ,कर्तव्याचे

खरोखरच का हो

अवमूल्यन होते-

म्हणून मनापासून वाटते

ओळख तिची

नव्याने झाली पाहिजे

हाऊस वाईफ ऐवजी

आपण तिला अभिमानाने

क्वीन ऑफ हाऊस

म्हंटले पाहिजे-

हीच उपाधी अन हाच हुद्दा

तिला खरोखरच शोभून दिसतो

माझ्या घराच्या शिरपेचास

तिच्या वास्तव्याने तो

घराची आभा वाढवितो-

संकल्प केला आत्तापासुनी

क्वीन ऑफ हाऊस म्हणून

गृहलक्ष्मीला संबोधणार

तिच्या चेहऱ्यावरचे तेज पुन्हा

पुन्हा हो नित्य पाहणार-


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action