Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

गर्भांकूर

गर्भांकूर

1 min
221


बीज अंकुरे अंकुरे

माऊलीच्या गर्भामधे

जाणीवेने सुखावते

माता अंतर्मनामधे


दोन जीवांचे मीलन

बाळ झुले ओटीमधे

नाळेनेच जोडलेला

बाळ अंगोपांगामधे


आगमन अंकुराचे

मोदे भरले सदन

रोज स्मरण देवाचे

अन्न सात्विक सेवन


एक दिन अंकुराचा

झाला आता बाळराजा

जपे जीवापाड त्याला

असे कलित जीवाचा


पंख फुटे अंकुरासी

घेई झेप परदेशी

भेट संगणकामधे

वाटे सुनीसुनी कुशी


रमलेला परदेशी

नाही आठव मनासी

जन्मदात्री मी माऊली

कसे विसरु तयासी?


Rate this content
Log in